भारतात एकूण सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक  होणार आहे

येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे

केंद्रीय निवडणूक आयोगाने धडक कारवाई करत विक्रमी रोकड हस्तगत केली आहे

निवडणूक आयोगाने 1 मार्चपासून दररोज सुमारे 100 कोटी जप्त केले आहेत

निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 4650 कोटी रुपये हस्तगत केले आहेत

सन 2019मध्ये जप्त करण्यात आलेल्या एकूण रकमेपेक्षा ही रोकड अधिक आहे

हा धडका असाच चालू राहिला तर गेल्या 75 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरेल

मसल आणि मनी पॉवरचा वापर करणाऱ्यांवर  कठोर करावाई करू,  असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे

कोणत्याही गैरव्यवहाराला थारा देणार नसल्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे

निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यावर भर देणार असल्याचे मुख्य आयुक्तांनी स्पष्ट केले होते