अनेक मराठी कलाकार  बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.  हिंदी चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं आदिपुरुष चित्रपटामध्ये "शूर्पणखा" ही भूमिका साकारली.

जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची  झलक दिसली.

राधिका आपटे ही सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर  यांसारख्या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसली

प्रिया बापटनं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि  दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

मिथिलानं ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमध्ये काम केलं.  तसेच 'कारवां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

अमृता खानविलकरने गोलमाल, फुंक, राझी, हिम्मतवाला, सत्यमेव जयते या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या