मार्च, एप्रिल आणि मे हे महिने राज्यात कडक उन्हाळ्याचे महिने. पण, सध्या राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढतो आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता आहे. तर काही भागात गारपीटही होऊ शकते.

दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फळ बागांचं नुकसान झालं आहे.

विदर्भातील अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा तसेच विदर्भात 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस येत असला तरी मुंबईत मात्र गेल्या काही दिवसात उकाडा प्रचंड वाढला आहे.

पुढील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सोबतच गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.