अयोध्येत आज रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे.

राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत राम नवमी साजरी केली जात आहे.

राम नवमीनिमित्त अयोध्येतील मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीला देखील श्रृंगार करण्यात आला आहे

दुपारी मुहुर्ताप्रमाणे रामलल्लाच्या मुर्तीला पुजाऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला

राम नवमीनिमित्त प्रभू श्री रामाच्या कपाळी सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला.

सूर्यकिरण अभिषेकासाठी राम मंदिर निर्माण करताना वैज्ञानिक विशेष मेहनत घेतली होती.

राम नवमीनिमित्त 25 लाखांपेक्षा अधिक भाविक अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. 

अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान  गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

राम गडी येथील हनुमानाच्या मुर्तीलाही विशेष श्रृंगार करण्यात आला आहे.