आयपीएल 2025 चा
18 वा हंगाम 21 मार्चपासून रंगणार आहे.
स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व संघाच्या मालकांकडून त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला आपला कर्णधार असल्याचे जाहीर केले होते.
यानंतर आता लखनऊ सुपर जायंट्स संघानेही आपला कर्णधार जाहीर केला आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात एलएसजी संघाने विकेटकीपर पंतला तब्बल 27 कोटींना खरेदी केले होते.
ऋषभ पंत हा यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात आज एलएसजी संघाचे मालक संजीव गोयंका यांनी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली.
ऋषभ पंत हा एलएसजी संघाचा कर्णधार असेल, अशी घोषणा त्यांनी केली.
कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर संघासाठी मी 200 टक्के देण्याचा प्रयत्न करेल, असे वचन पंतने दिले आहे.
तसेच नवीन सुरुवातीसाठी
मी खरोखर उत्साहित आहे, असेही पंतने म्हटले.