भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 51 वा वाढदिवस. 

1987 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेवेळी सचिन फक्त 14 वर्षांचा होता. तेव्हा तो बॉल बॉय म्हणून काम करत होता.

सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. 

सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यापैकी अनेक विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिलाच खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे द्विशतक झळकावले होते. 

विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. याबरोबरच सहा विश्वचषक खेळणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 34 हजारांहून अधिक धावा आहेत. याशिवाय 100 शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 

कसोटीत सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. कसोटीत 2058 हून अधिक चौकार त्याने मारले आहेत. 

सचिनने तब्बल 22 वर्षे 91 दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळून रसिकांचे मनोरंजन केले. सचिनशिवाय इतर कोणत्याही खेळाडूची एवढी प्रदीर्घ कारकीर्द झालेली नाही.

क्रिकेटमधील योगदानाबद्दल सचिनला 1997 मध्ये राजीव गांधी क्रीडा पुरस्कार, 1998 मध्ये पद्मश्री, 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2014 मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.