मुंबई आणि बंगळुरुच्या सामन्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल होणार फोटो पाहून अभिनेत्री श्रद्धा कपूरही आश्चर्यचकीत झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी मुलगी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसते.

वानखेडेवर झालेल्या मॅचमध्ये या  मुलीचा फोटो व्हायरल होतोय. ही अगदी श्रद्धा कपूरसारखी दिसते अशीही चर्चा झाली.

सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, ही व्हायरल झालेली मुलगी श्रद्धा कपूरची बहीण आहे.

श्रद्धा कपूरने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीवर या व्हायरल गर्लचा फोटो शेअर करत गंमतीत लिहिले, 'अरे मीच आहे ही!'

श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल आहे.  प्रगती नागपाल असे तिचे नाव असून तिचे इन्स्टाग्रावर 190k फॉलोअर्स आहेत.

प्रगती नागपाल प्रोफेशनल गायिका आहे. 4 एप्रिल 2024 रोजी तिचं 'यूजलेस भावरा' हे पहिलं गाणं आलं.