टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

तरुण खेळाडू यशस्वी जयस्वाल याला विश्वचषक स्पर्धेत संधी देण्यात आली आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. 

सुपला शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवला विश्वचषकात संधी देण्यात आली आहे.

गंभीर दुखापतीतून परतलेल्या ऋषभ पंतचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनची निवड विश्वचषकासाठी करण्यात आली आहे.

सध्या सर्व भारतीयांच्या टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

सध्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आक्रमक खेळी करणाऱ्या शिवम दुबेलाही टी-20 विश्वचषकात संधी देण्यात आली आहे.

आक्रमक गोलंदाजीने समोरच्या खेळाडूला त्रिफळाचित करणाऱ्या रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

फिरकीपटू अक्षर पटेल याचा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. संघाला याचा नक्कीच फायदा  होणार आहे.

आपल्या गोलंदाजीने सर्वांना अवाक करणाऱ्या कुलदीप यादवला या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे.

फिरकीपटू युझवेंद्र चहल याला टी-20 विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाली आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टी-20 वर्ल्डकपसाठी जलदगती गोलंदाजामध्ये अर्शदीप सिंगला संधी दिली आहे.

जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह याचा टी-20 साठी जाहीर करण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे.

जलदगती गोलंदाजांच्या यादीमध्ये मोहम्मद सिराजचाही समावेश करण्यात आला आहे.  तीन जलदगती गोलंदाजांना विश्वचषकासाठी संधी.