डिजिटल व्यवहार आणि आवाक्यातील किमतींमुळे मोबाइल वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

भारतात 1.2 अब्ज मोबाइल फोन वापरणारे आहेत. तर, 60 कोटी लोक स्मार्ट फोन वापरतात.

एकेकाळी आयातदार असलेला भारत आता मोबाइल फोनचा निर्यातदार देश बनला आहे.

मोबाइल निर्यातदार देश म्हणून भारताच्या उदयामुळे चीन आणि व्हिएतनामला मोठा फटका बसला आहे.

भारतातील स्मार्टफोन निर्यातीत गेल्या 10 वर्षांत  20 पटीने वाढ झाली आहे.

भारतात Xiaomi, Oppo, Samsung, Apple, Vivo, Realme आणि One Plus यासह अनेक कंपन्यांचे फोन उपलब्ध आहेत.

4G आणि 5G सुरू झाल्यानंतर तरुणांमध्ये मोबाइलची क्रेझ आणखी वाढली आहे.

अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे.

सध्या ॲपलचे उत्पादन भारतातील एकूण उत्पादनांच्या 14 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने डिजिटल वित्तीय सेवांची मागणीही वाढत आहे.