नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाकडून प्रत्येकाच्याच काही न काही अपेक्षा आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. 13 जानेवारी रोजी याला सुरुवात होईल.
प्रयागराज येथे 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे. यासाठी सध्या येथे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हे वर्ष अत्यंत विशेष असणार आहे. या वर्षी दसऱ्याला संघाची 100 वर्षे पूर्ण होणार आहेत.
27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीलाच नागपूर येथे संघाची स्थापना करण्यात आली.
2025 मध्ये भारत क्वाड शिखर संमेलनाचे यजमानपद भूषवेल. गेल्यावर्षी याचे आयोजन अमेरिकेत करण्यात आले होते.
यात भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानचा समावेश आहे.
यंदा देशात जनगणना होण्याची शक्यता आहे. जनगणना पूर्ण होण्यासाठी जवळपास वर्षभराचा वेळ लागू शकतो.
यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये कोरोनामुळे जनगणना होऊ शकली नाही.
1 जानेवारी 2025 पासून जनरेशन बीटाला सुरुवात झाली आहे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर 2049 पर्यंतची मुले बीटा जनरेशनची असतील.