सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलची निर्मिती केली आहे.

गुन्हेगारांच्या शोधासाठी इंटरपोलची मदत घेतली  जात होती. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मंगळवारी (ता. 07 जानेवारी) करण्यात आले.

या पोर्टलमुळे सायबर क्राइम, फाइनांशियल, ऑर्गनाइज्ड क्राइम, इंटरनॅशनल क्राइम यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत होईल. 

या पोर्टलच्या माध्यमातून देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलमुळे मोठी मदत होणार आहे. 

पोर्टलच्या माध्यमातून सीबीआय कोणत्याही केसमध्ये सहकार्य मागू शकते.

जगभरात सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाइन दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी यासह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.

गुन्हेगार गुन्हा करून इतर देशात पळून जातात. अशावेळी त्यांना पकडणे स्थानिक पोलिसांसाठी आव्हान असते. 

देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे हे आजही सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे.