विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट सतत व्हायरल होत असतात.
सूत्रांच्या माहितीनुसार आता विराट आणि अनुष्काने अलिबागमध्ये घर घेतले आहे.
विराट आणि अनुष्काचा बंगला अतिशय खास पद्धतीने डिझाइन केले आहे.
अलिबागमधील त्यांच्या नव्या आलिशान घराचा गृहप्रवेश नुकताच केला आहे.
या जोडप्याने २०२२ मध्ये हे घर सुमारे १९ कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि त्यावर ३६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी होती.
अहवालांनुसार, व्हिलामध्ये चार बेडरूम, दोन कव्हर्ड कार पार्किंग, चार बाथरूम, प्रायव्हेट स्विमिंग पूल, स्टाफ क्वार्टर आणि आधुनिक सुविधांनी किचन आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये या जोडप्याचे घर फुलांनी सजवलेले दिसत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या नवीन घरात हाऊस वॉर्मिंग समारंभ आयोजित करणार आहे अशी बातमी समोर आली आहे.