मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

मराठीबरोबरच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

अमृता सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करते.

नुकतंच प्रेक्षकांच्या या लाडक्या चंद्राने एक नवीन फोटोशूट केलं आहे.

तिच्या या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिचा मनमोहक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोय.

अमृताने गोल्डन येलो रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

तिने केस मोकळे सोडले आहेत व अगदी हलकासा मेकअप केला आहे.

सोबत मोठे कानातले, टिकली, बांगड्या असा तिचा हा लूक खूपच खास दिसतोय.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता नुकतीच धर्मरक्षक संभाजी महाराज या सिनेमात दिसली. यात तिची येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.