चेहरा स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे फेसवॉश आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्स मिळतात.
परंतु स्वयंपाकघरातील काही रोजचे पदार्थ वापरूनही तुम्ही नितळ आणि मुलायम त्वचा मिळवू शकता.
अर्धा चमचा मध तळहातावर घेऊन त्यात पाण्याचे काही थेंब मिसळून ते चेहऱ्यावर फेसवॉशप्रमाणे लावू शकता.
मधात कच्चे दूध मिसळून किंवा लिंबूरस टाकून त्याचाही फेसवॉशप्रमाणे वापर करता येईल.
1 चमचा दही तळहातावर घेऊन त्याची चेहऱ्यावर मालिश करा यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक येईल.
दह्यामध्ये मध किंवा बेसन टाकून ते उटण्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.
बेसन, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ आणि ओटमील यानेही चेहरा क्लीन केला जाऊ शकतो.
कच्चे दूध कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने चेहऱ्याला लावू शकता यामुळे त्वचा क्लीन आणि मुलायम होते.
याव्यतिरिक्त टोमॅटो, काकडी किंवा बटाट्याचा रसदेखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
हे सर्व पदार्थ चेहऱ्यावर लावल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.