गेल्या काही वर्षात ब्रोकोली खाण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ब्रोकोली अत्यंत उपयुक्त मानली जाते.

ब्रोकोली ही पौष्टीकतेने परिपूर्ण अशी भाजी असून जी विविध प्रकारे आरोग्यसाठी फायद्याची ठरते.

ब्रोकोलीमध्ये कॅरीटीनाईड ल्युटीन आढळते. याने हार्टच्या धमन्या निरोगी राहतात. परिणामी, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरतात.

ब्रोकोलीमध्ये फोलेट असते, फोलेट चांगला मूड राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते, ज्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

प्रेग्नेंट महिलांनी ब्रोकोलीचे सेवन अवश्य करावे. यामध्ये असलेले घटक मुलाच्या आरोग्यसाठी आणि विकासासाठी फायदेशीर असतात.

ब्रोकोलीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, ज्याने पचन होण्यास मदत होते.