लवंग ही त्यांच्या अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखली जाते.

सकाळी लवंग चघळल्याने लाळेचे उत्पादन वाढते जे पचनास मदत करते.

लवंग फक्त जेवणाला चवदार बनवण्यासाठीच वापरली जात नाही तर ती अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

लवंगामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ते अँटीऑक्सिडंट्सचे मुख्य स्त्रोत देखील आहे.

काही जण मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खातात. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.

लवंगामुळे शरीराची पचनप्रक्रियाही मजबूत होते.  सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.

बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

लवंगीमुळे दातांचे दुखणेही कमी होते. कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे.

भूक वाढवण्यासोबतच पोटातील जंतांच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 

जर कोणाची हाडे कमकुवत असतील किंवा हाडांना सूज येत असेल तर सकाळी उठल्यावर दोन लवंगाच्या कळ्या चघळणे हा उत्तम पर्याय आहे