रंगाने पांढरा शुभ्र असलेला मुळा पाहिला की, अनेक जण नाक मुरडतात.

मात्र, हाच मुळा औषधी आहे. त्यामुळे याचे आहारात सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

 ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे.

मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी मुळ्याचे सेवन केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.

मुळ्यात क जीवनसत्त्व, फॉस्फरस आणि बी कॉम्प्लेक्स असते. यामुळे त्वचाविकार दूर होतात.

मुळा खाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मुळा नैसर्गिक औषधाचे काम करते. त्यामुळे मूत्राशयासंबंधी समस्या असल्यास मुळ्याचे सेवन करावे.

कावीळ झालेल्या व्यक्तीने आहारात मुळ्याचा समावेश करावा.