मंगळसूत्राला भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं लेणं मानल्या जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध पतीच्या दीर्घायुष्याशी जोडल्या गेला आहे. असे मानले जाते की मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते.

पण मंगळसूत्राचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. काय आहेत हे फायदे जाणून घेऊयात.

मंगळसूत्र परिधान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते .

शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील  रक्तदाब  नियंत्रणात ठेवते.

पवित्र धागा स्त्रीच्या शरीरातील रक्त परिसंचरण देखील नियमित करतो आणि तिला दिवसभर सक्रिय ठेवतो.

मंगळसूत्रातील तीन गाठी वैवाहिक जीवनातील तीन मुख्य गोष्टी दर्शवतात.

प्रथम गाठ एकमेकांबद्दल आदर, दुसरी पालकांबद्दलचे प्रेम आणि तिसरी गाठ देवाबद्दल आदर ठेवण्याची आठवण करून देते.

इतक्या वर्षांनंतरही मंगळसूत्राचे महत्त्व बदललेले नाही. याला अजूनही खूप महत्त्व दिले जाते आणि ते हिंदू संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे.