जर तुम्ही उन्हाळ्यात लग्न करणार असाल तर मेकअपबाबत काही काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यातील मेकअप हॅकबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे, ज्या मदतीने उन्हात आणि घामातही लूक ताजे ठेवू शकता.

पण लग्नात तुमच्या मेकअपच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास मेकअप  दिवसभर फ्रेश राहील.

उन्हाळ्यात तुम्ही कॉम्पॅक्ट फाउंडेशनसह सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्रायमर लावायला विसरू नका. यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहतो.

प्रोडक्ट खरेदी करताना वॉटरप्रूफ प्रोडक्टची निवड करा. वॉटरप्रूफ मस्करा, आयलाइनर आणि फाउंडेशनची निवड करा.

उन्हाळ्यात मेकअप लाइट पातळ लेअरचा बेस असला पाहिजे. त्याने तुमचा मेकअप नॅचरल वाटतो.

चेहऱ्यावर बेस अप्लाय करून झाल्यावर डोळ्यांचा मेकअप करा. डोळ्यांचा मेकअप करताना सर्व वॉटरप्रुफ प्रोडक्ट्सचा वापर करा.

मेकअपनंतर सेटिंग स्प्रे लावा. हे डोळ्यांच्या मेकअपपासून ते लिपस्टिकपर्यंत  सर्व गोष्टींचे संरक्षण करेल.

घाम आल्यावर चेहरा पुसण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल वापरा. चेहऱ्यावर अजिबात टिशु किंवा रुमाल घासू नका.