वेलची ही नेहमी पदार्थांचा सुगंध आणि स्वाद वाढवण्यासाठी वापरतात.

खास करुन अनेक गोड पदार्थांमध्ये वेलचीचा वापर करतात.

वेलची दिसायला जरी छोटीशी असली तरी गुणांनी खूप मोठी आहे.

वेलचीमध्ये लोह, रायबोफ्लोविन सोबतच विटामिन-सी सारखे पोषक तत्व असतात.

वेलची लाल रक्त पेशींची वाढ करण्यात मदत करते. त्यामुळे वेलचीचे नियमित सेवन केल्यास एनिमिया होत नाही.

वेलचीच्या सेवनाने पचनासंबधीत सर्व आजार दूर होतात व पचन क्रिया सुरळित होण्यास मदत मिळते.

वेलची अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर करण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना ज्यांना अ‍ॅसिडिटीची त्रास आहे त्यांनी आवर्जून नियमित वेलची खावी.

वेलची रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. त्यामुळे हृदयरोग संबंधित सर्व आजारावर वेलची खूप लाभदायी आहे.