टूरवरून आल्यानंतर आपण खूप थकतो.
त्यामुळे बऱ्याचवेळा आपण बॅग कुठेही टाकून मोकळे होतो.
बॅग लवकर स्वच्छ केली नाही तर बॅगमधील सामान आणि बॅग दोन्ही खराब होऊ शकते.
आज आपण बॅग स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
बॅग रिकामी करून बॅगचे प्रत्येक खिसे तपासून उलटून आणि झटकून घ्या.
आपण लांब प्रवास करायला जातो. तेव्हा बॅगमध्ये खूप कचरा जमा होतो. अशावेळी ती घाण काढण्यासाठी तुम्ही कपड्याचा वापर करू शकता.
हलके डाग काढण्यासाठी कोमट पाण्यात माइल्ड डिटर्जंट मिसळा.
बॅगेची आतील स्वछता देखील खूप महत्वाची असते. त्यामुळे बॅगेची आतली बाजू नीट पुसून घ्या.
बॅगेतून दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही बॅगमध्ये बेकिंग सोडा किंवा कापराच्या गोळ्या काहीवेळ ठेवू शकता.
अशाप्रकारे तुम्ही बॅग स्वच्छ करू शकता.