ओव्हन मधून दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नाचे उरलेले कण, चरबी किंवा जळलेले पदार्थ असू शकतात.
जर ओव्हन नीट साफ नसेल तर वारंवार त्यातून दुर्गंधी येते .
आज आपण जाणून घेऊयात ओव्हनची दुर्गंधी कशी घालवायची.
तुम्ही सोडा आणि व्हिनेगरचा वापर करून ही दुर्गंधी घालवू शकता.
काही लिंबाचे तुकडे एका पाण्याच्या भांड्यात ठेवून ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे 180°C वर गरम करा.
नंतर आतल्या भागाला लिंबाच्या तुकड्याने चोळून घ्या.
कॉफी पावडर किंवा कोळशाचा वापर करून सुद्धा तुम्ही ओव्हनची दुर्गंधी घालवू शकता.
ओव्हनचे नियमित साफसफाई करा.