मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आहाराची निवड करणं खूप महत्वाचं आहे.

अलीकडच्या काळात अनेक मुलं फास्ट फुडच्या आहारी गेले आहेत.

ज्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर आपल्याला पाहायला मिळतो.

या पदार्थांमध्ये पिझ्झा, बर्गर, चिप्स यांचा अधिक समावेश आहे, हे पदार्थ खाणं मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहेत.

मैद्यापासून तयार बिस्कीट्स, टोस्ट खाणं देखील आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही.

चॉकलेट, कँडी, मिठाई, केक जास्त प्रमाणात खाणं देखील मुलांच्या दातांसाठी घातक मानलं जातं.

सतत चायनीज, मॅगी खाणं देखील मुलांच्या आरोग्यावर परिणाम करते.

कोल्डड्रिंक्स देखील मुलांच्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाहीत.