डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे.

जास्त स्क्रीन पाहणे, खूप कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे काळी वर्तुळे असू शकतात.

यामुळे आम्ही तुम्हाला या डार्क सर्कलपासून मुक्त होण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी तुम्ही थंड दूध वापरू शकता. कापूस दुधात भिजवा आणि डार्क सर्कल आहेत तिथे ठेवा.

संत्र्याची साले वाळवून बारीक करून घ्या . या पावडरमध्ये गुलाबजल मिसळून लावा. यामुळे डार्क सर्कल सहज दूर होतील.

बटाट्याच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाने डोळ्यांखाली लावा.

टोमॅटो नैसर्गिक पद्धतीने डार्क सर्कल दूर करण्याचे काम करते. टोमॅटो त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम  होते.

कोरफडीचे जेल डोळ्यांखाली लावा आणि 15 मिनिटे राहू द्या.  असे केल्याने काळी वर्तुळे कमी होतील.

डोळ्यांवर 10-15 मिनिटे गुलाबपाणी लावा. गुलाबपाणी त्वचेवर थंड प्रभाव टाकते.