ऑफिस डेस्क जर नीटनेटका असेल तर काम करण्यास उत्साह येतो.

ऑफिस डेस्क स्वच्छ करण्यासोबतच जर त्यावर प्लान्ट ठेवले तर वातावरण प्रसन्नही होते.

सिंगोनियम प्लान्ट केवळ डेस्कचे सौंदर्य वाढवत नाही तर हवा देखील सुद्धा करते. याच्या उत्तम वाढीसाठी तुम्ही मातीऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा.

गोल्डन पोथोस प्लान्ट तुम्ही ऑफिस डेस्कसह घरीसुद्धा ठेऊ शकता. या वनस्पतीला केवळ आठवड्यातून एकदा प्रकाश दाखविण्याची गरज असते.

फिलोडेंड्रॉन प्लान्टचे सौंदर्य त्याच्या पानांमध्ये असते. या प्लांटची पाने खूपच आकर्षक असतात. त्यामुळे ऑफिस डेस्कसाठी तुम्ही या प्लान्टचा वापर करू शकता.

संसेवीरा प्लान्टची पाने पिवळ्या आणि हिरव्या रंगात असतात. ऑफिस डेस्कसाठी हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.

क्लोरोफायटम ही हवा शुद्ध करणारी वनस्पती मानली जाते. याची पाने गडद हिरवी रंगाची असतात.

क्लोरोफायटम प्लांटला सूर्यप्रकाश आणि पाण्याची फारशी गरज नसते.

बांबू प्लान्टचे अनेक फायदे असून ऑफिस डेस्कसाठी तुम्ही बांबू प्लान्ट वापरू शकता.

बांबूमुळे हवा शुद्ध होते आणि टोल्यूइन, झायलीन, बेन्झीनसारख्या कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या घटकांना बांबू दूर ठेवते.