उन्हाळ्यात गरमीमध्ये केस सांभाळणे खूप अवघड होते. अशावेळी आपल्याला हवी ती हेअर स्टाईल करता येत नाही.

आम्ही काही हेअरस्टाईल सांगणार आहोत जे स्टाईलिश लूकसोबत गरमीचाही त्रास होऊ देत नाही.

हाय पोनीटेल   ही हेअरस्टाईल जितकी साधी तितकीच स्टायलिश आहे. केस विंचरा आणि  नंतर हेअर टायच्या मदतीने पोनीटेल बांधा.

हाफ बन लूक   हाफ केस घेऊन छोटा अंबाडा घाला. जर मोकळ्या केसांचा लूक आवडत असेल तर ही हेअरस्टाईल करू शकता.

पोनी टेल  ही कमी वेळात होणारी हेअरस्टाइल आहे. टॉप किंवा ड्रेस घातला असल्यास वेगळा लूक मिळवण्यासाठी पोनी-टेल बांधू शकता.

फ्रेंच ब्रेड्स तुम्ही पुढल्या बाजूला कानाच्या दिशेनं किंवा खाली मानेच्या दिशेनं कोणत्याही प्रकारे बांधू शकता.

मेस्सी बन हेअरस्टाईल करणं सोपी असते. हा बन कुर्त्यापासून ते वेस्टर्न टॉपपर्यंत सगळ्यांवर शोभून दिसतो

साधी वेणी  उन्हाळ्यात तुम्हाला वेणीचे वेग वेगळे प्रकार बांधता येत नसतील तर तुम्ही साधी वेणीही कॅरी करु शकता.

ट्रेंडनुसार हेअरस्टाइल सुंदर दिसण्यासाठी बाजारात किंवा ऑनलाइन हेअर अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध असतात.

लहान केसांसाठी बाजारात अनेक रंगबेरंगी हेअरबँड, स्कार्फ आणि क्लिप्स मिळतात.

केसांना नियमितपणे सिरम लावा जेणेकरून केस मुलायम राहतील.