बहुतेक मुलींना तेलकट त्वचेची समस्या असते आणि उन्हाळ्यात त्यांची त्वचा त्यांना खूप त्रास देते.

तेलकट त्वचेमुळे त्रस्त व्यक्ती अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतात, पण त्याच्या वापराने स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते.

अशावेळी काही घरगुती उपाय वापरून तुम्ही तेलकट त्वचेपासून सुटका मिळवू शकता.

योग्य मॉइश्चरायझर निवडा. यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. मॉइश्चरायझर वापरल्याने चेहऱ्यावरील छिद्रे ब्लॉक होतात.

पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो.

कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि नंतर चेहऱ्याची मालिश करा. असे केल्य़ानेही चेहऱ्याचा तेलकटपणा जातो.

तेलकट त्वचेची समस्या असणाऱ्यांनी तेलकट आहार टाळावा. आपण जे खातो त्यानुसार आपले शरीर बनते

तेलकट त्वचेसाठी एलोवेरा वापरताना आंघोळीच्या एक तास आधी चेहऱ्याला एलोवेरा लावा. 

मधामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तेलकट त्वचेमध्ये मुरुमांच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात.

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी टोमॅटो हा उत्तम उपाय आहे. टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक अ‍ॅसिड असते