मुलींसाठी मेकअप करणे जितके महत्वाचे आहे तितकेच तो रिमूव्ह करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. अनेक जण मेकअप रिमूव्ह करण्यासाठी वाईप्स, क्लिनींग मिल्क आणि मायसेलर वॉटरचा वापर करतात.पण या तिघांपैकी योग्य काय आहे ? आणि ते काय काम करते हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

मेकअप रिमूव्हरचा वापर वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी होतो. मात्र, ज्या स्त्रियांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी याचा वापर करताना योग्य काळजी घेणं गरजेचे आहे तसेच मेकअप रिमूव्हर वापरल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ करून आपल्या त्वचेची काळजी घेणे गॅरेजचे आहे.

मायसेलर वॉटर फक्त मेकअपच नाही तर चेहऱ्यावरील अनेक प्रकारची डेडस्कीन आणि ऑइल काढून टाकण्यात उपयोगी ठरते. तसेच मायसेलर वॉटर हे तेल आणि पाण्याचे मिश्रण आहे. विशेष म्हणजे मायसेलर वॉटरने तुम्ही वॉटरप्रूफ आय मेकअप देखील काढू शकता. 

क्लींजर हे क्रीमसारखे असते, जे तुमच्या चेहऱ्यावरील तेल, चिकटपण आणि घाम साफ करण्यास मदत करते. याशिवाय, हलका मेकअप काढण्यासाठी देखील हे उपयोगाचे आहे. सामान्यत: क्लींजर हे क्लिन्झिंग लोशन, क्लिन्झिंग ऑइल, क्लिन्झिंग फोम किंवा क्लिंजिंग बाम इत्यादींमध्ये आढळते.