शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले आणि दुसरे खराब कोलेस्ट्रॉल.
खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक असते.
खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.
केळी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
केळ्यामध्ये पोटँशियम असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते.
जेवणानंतर किमान २ तासानंतर केळी खावी. रात्री केळ्याचे सेवन कधीही करू नये.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना अपचन आणि पोटात गॅस तयार होण्याची समस्या असते. अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्यानुसार केळी खावीत.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल तपासण्यासाठी दर ३ महिन्यांनी एकदा लिपिड प्रोफाइल टेस्ट करून घ्यावी. ही टेस्ट शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल काय आहे ते दर्शवते.