हृदयविकार हा सध्या वाढत चाललेला आजार आहे.
हृदयाच्या वाहिन्यांमध्ये ब्लॉक निर्माण झाल्याने हार्ट अॅटॅक , स्ट्रोकचा धोका वाढतो.
परिस्थिती बिघडली तर मृत्यूही ओढवू शकतो. यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी जेवण बनवताना 5 तेलांचा वापर करण्याचा सल्ला दिलाय.
या तेलांचा वापर करत कोलेस्ट्रॉल आणि हृदविकारापासून वाचता येईल असं नेने म्हणाले.
मोहरीच्या तेलात असणारे मोनो आणि पॉली सॅच्युरेटेड फॅटस कोलेस्ट्रॉल मर्यादित ठेवू शकतात.
शेंगदाणा तेलही बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते.
डॉ. नेनेंच्या म्हणण्याप्रमाणे, राइस ब्रान तेलही हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
तिळाचं तेलदेखील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि शरीरातील नसाही मोकळ्या करते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचाही वापर करू शकता.