उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकांना या दिवसात प्रामुख्याने उष्माघाताचा त्रास जाणवतो.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे महत्वाचे असते. अशावेळी तुम्हाला काही घरगुती पेयांची मदत होऊ शकते.

पन्हे उष्माघात टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. पन्हे कच्चा आंबा, साखर आणि मसाल्यांपासून बनविले जाते.

पन्ह्यामध्ये अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात आढळतात. जे आपल्याला आजारी पडण्यापासून रोखते.

लिंबू पाणी व्हिटॅमिन सी समृद्ध पेय आहे. उन्हाळ्यात तुम्ही हे घरगुती पेय पिऊ शकता.

लिंबू सरबताची चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात जिरे किंवा काळीमिरीदेखील घालू शकता.

उन्हाळ्यात तुम्ही नारळपाणी पिऊ शकता. नारळ पाणी शरीरास अँटीऑक्सीडेंट प्रदान करते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित ठेवते.

भर उन्हात कलिंगडाचा ज्यूस केवळ तुमची तहान भागवणार नाही तर तुम्हाला हायड्रेटही ठेवेल.

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि उष्णतेवर मात करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही एक ग्लास कलिंगडाचा ज्यूस प्यायला हवा.