दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात नियमित दह्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो.

दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आदी पोषक घटक असतात.

दही दुधापासून बनविले जाते. त्यामुळे त्यात दुधाचे पौष्टिक घटक तसेच काही अतिरिक्त गुणधर्म आढळतात.

उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे पोटातील जळजळ कमी होते.

उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी होते.

हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात करण्यासाठी दही फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात प्रामुख्याने तोंडातील अल्सर झाल्यास दह्याचे सेवन तुम्ही करू शकता.

पचनशक्ती निरोगी राहण्यासाठी दही फायदेशीर ठरते.

दह्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

दही खाल्याने त्वचेच्या विविध समस्या कमी होतात आणि त्वचेवर चमकही येते.