खीर असो वा रव्याचा शिरा स्वाद वाढविण्यासाठी हमखास मनुके वापरण्यात येतात.

चवीसाठी वापरला जाणारा मनुका त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. त्वचेच्या समस्या दूर करून त्वचेची चमक वाढविण्यासाठी मनुके खाणे उत्तम पर्याय मानला जातो.

मनुक्यात असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात.

मनुक्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, आयर्न, पोटॅशियमसह अनेक पोषक असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यास गरजेचे असतात.

तुम्हाला टॅनिंग, पिंपल्स, रिंकल्स अशा त्वचेच्या समस्या भेडसावत असतील तर मनुके अवश्य खा.

खाण्यासोबत तुम्ही मनुक्याचा वापर टोनर किंवा फेसपॅक म्हणून  करू शकता.

मनुक्याचे टोनर बनविण्यासाठी मनुके भिजवलेल्या पाण्यात एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा.

मनुक्याच्या पाण्यात थोडे मध, एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन इ कॅप्सूल टाकून जाडसर पेस्ट तयार करा.

तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा आणि काही वेळा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.