इन्स्टंट एनर्जीसाठी मिळविण्यासाठी अनेक जण कॉफी घेतात. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॉफीचे सेवन हे आरोग्यसाठी हानिकारक आहे.

कॉफी व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ ज्यातून तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते. जे तुम्ही ऑफिसच्या स्नॅक्समध्ये किंवा घरी सुद्धा खाऊ शकता.

 इन्स्टंट एनर्जीसाठी केळी हा उत्तम पर्याय आहे. पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ केळ्यात असल्याने स्नायूंना आराम मिळतो.

संत्री, द्राक्षे यासारखी आंबट फळे तुम्ही खाऊ शकता. ही फळे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमने परिपूर्ण असतात.

व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम या फळांमध्ये असल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन पुन्हा भरून निघते. ज्याने तुम्हाला उत्साही वाटते.

दह्यात प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे दह्याच्या सेवनाने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

जर तुम्हाला आळसपणावर मात करायची असेल तर  ५-६ बदाम किंवा २-३ अक्रोड तुम्ही खाऊ शकता.

झटपट एनर्जी मिळविण्यासाठी तुम्ही रताळे देखील खाऊ शकता.