शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन करणे महत्वाचे असते. केळी हे अशाच फळांपैकी एक आहे.

केळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आणि आवश्यक मिनरल्स असतात.

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी केळी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

केळी दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो. पण असे असले तरी केळी खाण्याची योग्य वेळ आहे.

केळी खाणे असंख्य फायदे आहेत, पण जर तुम्ही रिकाम्यापोटी केळी खात असाल तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात. अशा परिस्थितीत दररोज रिकाम्या पोटी केळी खाल्याने वजन वाढू शकते.

रिकाम्या पोट केळी खाल्याने पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

तुम्ही जर रिकाम्या पोटी केळी खाल्लेत तर ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते.