दररोज बिट खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यात अनेक व्हिटॅमिन्स असतात, जी शरीराला अनेक आजार होण्यापासून वाचवतात.

बीटाचा वापर आपण सॅंडवीज, पराठा, कोशिंबीर, सलाड यामध्ये विविध प्रकारे करतो.

बीटामध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे बीटाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचाही उजळते.

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही बीट खायला हवे.

नियमित आहारात बीट खाल्यास मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदू शार्प होतो.

बीटाच्या सेवनाने शरीरातील फॅट्स कमी होतात.

बीटामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते, जे पाचन समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त असते.

जर तुम्हाला नियमित बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर दररोज बीटाचा ज्यूस प्यायला हवा.

बिटामध्ये फोलेट आणि फायबर असते. त्यामुळे तुम्ही बीटाचा रस चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे  मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

बीटाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.