हल्ली अनेकजण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचे सेवन करतात.

ओट्स हा असा पदार्थ आहे, जो खायला स्वादिष्ट असतोच पण त्याचे फायदेही अनेक आहेत.

तुम्ही गव्हाच्या पोळी ऐवजी ओट्सच्या पोळीचे सेवन देखील करु शकता.

नियमित ओट्सची पोळी खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. 

ओट्सच्या पिठात फायबर, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो.

रोज ओट्स खाल्ल्यामुळे ह्रदयाशी निगडीत आजार होण्याची संभावना कमी होते. बीटा ग्लुकेन फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते.

ओट्समध्ये असलेल्या फायबर आणि मॅग्नेशियममुळे डोक्यातील सेरोटोनिनची मात्रा वाढते. त्यामुळे डोकं शांत राहून चांगली झोप लागते.