पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषतः रिकाम्या पोटी पपई खाल्याने अनेक आजार दूर होतात.

रिकाम्या पोटी पपई खाल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

व्हिटॅमिन ए, सी सारख्या अँटीऑक्सीडेंट्सने समृद्ध असते. पपईच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा ग्लो सुद्धा होते.

पपईमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने पपईच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्याने शरीराला कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

पपई दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यात मदत करते. परिणामी, आपण कमी खातो आणि वजनही नियंत्रणात राहते.

एका संशोधनानुसार, पपई खाल्याने मूड चांगला राहतो.

बीटा - कॅरोटीन आणि व्हिटॅमिन 'ए' समृद्ध पपई मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी करते. म्हणजेच वाढत्या वयामुळे दृष्टी गमावण्याचा धोका कमी करते.

पपईमुळे पचन व्यवस्थित होते.