कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सीडेंट्स, पाणी आदी पोषक घटक असतात.

कलिंगडाचे सेवन उन्हाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे मानले जाते.

त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असणारे अँटीऑक्सीडेंट्स कलिंगडामध्ये आढळतात.

तुम्ही जर रोज कलिंगड खाल्ले तर त्वचा चमकदार होते.

कलिंगडामध्ये सुमारे ९२% पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी कलिंगडाचे सेवन अवश्य करा.  

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोज कलिंगड खावे.

उन्हाळ्यात प्रामुख्याने थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यावर मात करण्यासाठी ऊर्जा देणारे कलिंगडाचे सेवन फायद्याचे ठरते.

कलिंगडमध्ये फायबर, पाणी मुबलक प्रमाणात असते आणि कॅलरीज कमी असतात. अशाने वजन कमी करण्यासाठी कलिंगड फायदेशीर ठरते.

अपचन, ऍसिडिटी, गॅस आधी समस्यांनी त्रस्त असाल तर रोज कलिंगडाचे सेवन करावे.