रामचरण हा तेलगू सिनेमा मधला सुप्रसिद्ध अभिनेता आहे.
सध्या गेम चेंजर या सिनेमामुळे रामचरण खूप चर्चेत आहे.
रामचरणने नुकत्याच एका मंदिर आणि दर्ग्याला भेट दिली.
त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली.
चाहत्यांनी इतकी गर्दी केली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या व्हिडीओमध्ये त्याच्या मोटारीच्या काचेवरून चाहत्यांना तो त्याची झलक दाखवताना दिसत आहे.
राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
१० जानेवारी २०२५ रोजी 'गेम चेंजर' हा सिनेमा सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.