उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र उष्णतेपासून शरीराचा बचाव करणे आवश्यक असते.

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थाचे सेवन करू शकता.

दुधी भोपळ्याची चव थंडावा देणारी असते. यात भरपूर पाणी असते.

उन्हाळ्यात दुधी खाल्याने पचनक्रिया उत्तम राहते.

उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी कांदा खाणे उपयुक्त ठरते. कांदा शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतो.

उन्हाळ्यात भाज्यांसोबत सॅलडमध्ये मिक्स करून कांदा खायला हवा.

उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने खाल्याने शरीराला थंडावा मिळतो.

उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी किंवा सरबत प्यायल्याने शरीर थंड राहते.

दही खाल्याने उन्हाळ्यात शरीर थंड राहते आणि पोटाचा त्रास जाणवत नाही.