गणपतीचे विविध नाव व त्यांचे अर्थ अनेक आहेत.

लाडक्या बाप्पाची ही नावे तुम्हाला माहित असायलाच हवीत.

तसेच बाप्पाच्या नावाचे अनेक गर्भित अर्थ देखील माहित असणे आवश्यक आहे.

गणेश म्हणजे ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.

ॐकार - या एकाक्षर अक्षरात वरचा भाग गणेशाचे मस्तक, खालचा भाग उदर, अर्धचंद्र लाडू व मागची अर्धवर्तुळाकार रेघ म्हणजे सोंड असे म्हटले आहे.

वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव त्याला पडले.

विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे.

विनायक म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे.

गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले जाते.