तुम्हीही मासे खाण्याचे शौकीन असाल, पण मासे पाहून ताजे आहे की शिळे हे समजत नाही.

काहीवेळा ताजा दिसणारा मासा शिळा असतो. अन् तो खाल्ल्याने पोटही बिघडू शकतं.

मासे खरेदी करताना प्रत्येक माशाला वास आहे की दुर्गंध हे ओळखणे गरजेचे आहे.

माशांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गंधी असेल तर  मासा खराब झाला आहे.

माशाच्या डोळ्यांवर पांढरे थर नसावेत  ताज्या माशांचे डोळे चमकदार आणि फुगीर असतात.

मासे खरेदी करताना, ताज्या माश्याची पोत बाह्य, अंतर्गत दोन्ही बाजूंनी मजबूत असते.

ताज्या माशांची त्वजा चमकदार आणि स्वच्छ दिसते  त्याची त्वचा कडक व खवलेयुक्त असते.

मासे ताजे आहेत की नाही यासाठी  माशाच्या आतील भाग चमकदार लालसर गुलाबी रंगाचा आहे का ते पाहा.

ताजे मासे कापताना, ते नेहमी रक्तस्त्राव करते  आणि चमकदार गुलाबी रंगाचे असते.