डाळी आणि भाज्यांची चव वाढवण्यासोबतच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही तुमच्या घरीच लसूण पिकवू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला एक बाटली घ्यावी लागेल, ती कापून त्यात स्वच्छ माती टाकावी लागेल.
त्या मातीवर बिया शिंपडा. पुन्हा बियांवर थोडी माती, खत टाकून त्यावर पाणी टाका.
बिया चांगले दाबा आणि काही दिवस थांबा. तुम्हाला रोपाची वाढ दिसून येईल.
कोणत्याही नर्सरीमधून लसणाच्या रोपाच्या बिया विकत घेऊ शकता.
लसूण पिकवण्यासाठी हवामान थंड असावे हे लक्षात ठेवा. हिवाळ्यात लसूण चांगले वाढते.
रोपाला सतत पाणी द्यावे. रोज थोडेसे पाणी दिल्याने झाड निरोगी राहते.
खत जितके चांगले आणि नैसर्गिक असेल तितका जास्त फायदा झाडाला होईल.