जान्हवी कपूर ही शिखर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

नुकतीच अभिनेत्री तिच्या प्रियकरासोबत आंध्रच्या तिरूपती मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

यादरम्यान दोघांनीही पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

जान्हवीने गडद जांभळ्या रंगाचं पोलकं आणि मोरपिसी रंगाचा परकर परिधान केला होता.

या आऊटफिटमध्ये जान्हवी अगदी सोज्वळ देसी गर्ल दिसत होती.

तर शिखरने पारंपरिक पांढरे धोतर आणि सदरा परिधान केला होता.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा शिखर हा नातू आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर कपाडिया 2025 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

मात्र, दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

जान्हवी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.