मोबाईल सुरक्षित राहावा आणि  सुंदर दिसावा म्हणून विविध डिझाइन्सचे कव्हर आपण वापरतो.

परंतु ते अस्वच्छ झाल्यानंतर खूप खराब दिसू लागते.

अशावेळी मोबाईलवर जमा झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता.

यासाठी कव्हरवर मीठ लावून ते घासा. जेणेकरुन मळलेले कव्हर स्वच्छ होईल.

जर तुमचे कव्हर पिवळसर झाले असेल तर त्याला टुथपेस्टच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यामुळे त्यावरील डाग निघून जातील.

जर तुम्ही टुथब्रशवर बेकिंग पावडर लावून फोनचे कव्हर स्वच्छ करू शकता.

फोनचे कव्हर अस्वच्छ झाले असेल तर ते डिटर्जेंटच्या पाण्यात बुडवू ठेवा. थोडावेळाने ते ब्रशने स्वच्छ करा.

जर तुम्हाला कव्हर स्वच्छ करायचे असेल तर पाण्यात लिंबाचे थेंब टाका. यानंतर त्या पाण्याने तुमचे कव्हर स्वच्छ करू शकता.