आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडू नयेत यासाठी मकर संक्रांतीला काही अध्यात्मिक नियम पाळणे गरजेचे आहे.
कोणतेच झाड तोडू नये. अपशब्द किंवा कुणाला दुखावेल असं काही बोलू नये.
यादिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नका.
घरात कोणाला शिवीगाळ करू नका. यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दु:ख येतात.
या दिवशी चुकूनही मांस किंवा तामसी अन्न खाऊ नका.
तामसी पदार्थ म्हणजे कांदा, लसूण, वांगी, फणस किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
यादिवशी मद्यपान किंवा धूम्रपान करू नये.
ब्रह्मचार्य पाळावे आणि देवीदेवतांचा अपमान करू नये.
या पुण्य काळात केस किंवा नखे कापू नयेत.
हे नियम पाळल्यास घरात सुखसमृद्धी निर्माण होते.