बदामामध्ये अनेक पोषकतत्व असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर सिद्ध होतात.

लहान बाळांच्या आहारामध्ये देखील बदामाचा समावेश केला जातो.

लहान बाळांसाठी बदामाची पावडर देखील तयार केली जाते.

बदामाची पावडर तयार करण्यासाठी 1 कप बदाम, 1 लहान चमचा वेलची, केसर आणि 3-4 कप पाणी घ्या.

सर्वप्रथम 3-4 कप पाणी गरम करून घ्या आणि गॅस बंद करून त्यात बदाम टाका.

थोड्यावेळाने बदामावरील साल काढून घ्या.

बदाम सुकल्यानंतर एका जाडसर कढईत परतून घ्या.

आता या पावडरीमध्ये वेलची आणि केसर टाकून पुन्हा बारीक करून घ्या.

ही पावडर तुम्ही दूधासोबत मिक्स करून लहान बाळांना खाऊ घालू शकता.