बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
असं म्हटलं जातंय की तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासाठी स्क्रिप्ट्सही फायनल केल्या आहेत.
तिच्या या नव्या इनिंगसाठी तिला तिच्या कुटुंबियांची साथ लाभली असं तिने म्हटलं आहे.
या पुनरागमनासाठी ती अमेरिकेतून जवळपास तीन महिन्यांपूर्वीच मुंबईत परतली आहे.
मीनाक्षी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामधील सांस्कृतिक संध्येमध्येही सहभागी झाली होती.
यात तिने महाभारतावर आधारित द्रौपदी नृत्य-नाट्याविष्कार सादर केला होता.
मीनाक्षीने बॉलीवूडमध्ये दामिनी आणि घातक अशा तगड्या फिल्म्स दिल्या होत्या.
या फिल्म्समुळे तिने तिच्या प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले.
त्यामुळेच ती पुन्हा चित्रपटात कधी दिसणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.
या चित्रपटांनंतर ती 1995 मध्ये अमेरिकेमध्ये गेला. तिने या काळात तिच्या कुटुंबाकडेच लक्ष केंद्रित केले.