जेवणाची चव वाढविण्यासोबतच तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तळव्यांना तुपाने मसाज केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. याने थकवा दूर होतो आणि चांगली झोपही लागते.

जर तुम्ही घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तळवे तुपाने मसाज करण्याचा सल्ला दिला जातो.

देशी तुपात असलेले व्हिटॅमिन्स ए, इ, के स्ट्रेस कमी करण्यास उपयुक्त ठरते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडे गरम करून पायांच्या तळव्यांना आणि पायांच्या बोटांभोवती मसाज करा.

कोमट तुपाने तळवे मसाज केल्याने सर्दी- खोकल्यापासून आराम मिळतो.

तळव्यांना तुपाने मसाज केल्याने हाडे मजबूत होतात.

दीर्घकाळी बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या असल्यास, तळव्यांना तुपाने मसाज करणे फायद्याचे ठरते.